मित्रानो शालेय परिसरात नेहमी पक्षी दिसायचे. त्यातूनच पक्षांच्या नावाचा शोध घेण्याची जिज्ञासा वाढली. नगरचे आमचे पक्षिमित्र सातपुते सर यांच्याशी संपर्क आला. शालेय विद्यार्थ्यांच्या सहाय्याने पक्षिगणना करण्याचे ठरले. त्यातूनचसुरुवातीला मोबाईलवर फोटो काढले, नंतर सोनी कंपनीचा कॅमेरा घेतला. त्यातूनच पक्षाचे फोटो काढण्याचा छंद लागला.
या ब्लॉगवरील फोटो माझ्या कॅमेऱ्यातील आहेत. माहिती ही विकासपेडिया, विकीपेडिया व इंटरनेटवरून घेतली आहे. माहिती बरोबर असल्याची खात्री करावी.
हा हळद्या पक्षी मला खूप आवडला. घराशेजारी पिंपळाचे झाड आहे. त्यावर फळे खाण्यासाठी आला होता. ६० ते ७० फोटो क्लिक केले तेव्हा हा फोटो आला. फळे खाऊन पोट भरले तेव्हा व्यवस्थित पोज दिली.
No comments:
Post a Comment